दि.अ.नगर जैन ओसवाल को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर या संस्थेस नुकत्याच संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात तरतुदीपुर्वी नफा 61 लाख झ...
दि.अ.नगर जैन ओसवाल को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर या संस्थेस नुकत्याच संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात तरतुदीपुर्वी नफा 61 लाख झाला असून निव्वळ एन.पी.ए. 0% कायम राखण्यात आला आहे. ठेवीमध्ये 45% ने (8 कोटी 18 लाख) ची वाढ झाली असून बँक गुंतवणूक ठेवीच्या 50% आहे ही बाब संस्थेच्या दृष्टीने करुन दिलेले आहे. गरजू सभासदांना मोठ्या आजाराच्या औषधोपचारासाठी रुपये 20 हजारापर्यंत सहाय्य दिले जाते. सभासदांना अत्यंत कमी दराने अवघे रिबेट वजा जाता 12% व्याज दराने कर्जाचे वाटप करण्यात येत असल्याचे संस्थेचे विद्यमान चेअरमन किरण पोपटलालजी भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या व्हा.चेअऱमन सौ.सुजाता राजकुमारजी बोरा यांनी, जास्तीत जास्त महिला सभासदांनी संस्थेमध्ये व्यवहार करावा, महिलांसाठी विविध प्रकारचे सुलभ कर्जयोजना चालू करण्यासाठी प्रय़त्न केला जाईल असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यापारी सभासदासाठी लवकरच मार्केट यार्ड येथे शाखा उघडण्याचा मानस आहे. संस्थेच्या सर्व संचालकांनी अतिशय परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीसाठी सक्रीय सहकार्य केले त्यामुळे संस्थेची कर्ज थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे असे संचालक दिपक बोथरा म्हणाले.
यावेळी कायदे सल्लागार डीडी खाबीया हे उपस्थित होते. अशी माहिती व्यवस्थापक विलास गदिया यांनी दिली.










