नगर - गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2016 या दरम्यान संगीतमय भव्य श्रीरामकथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आह...
नगर - गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2016 या दरम्यान संगीतमय भव्य श्रीरामकथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केडगाव, भूषणनगर येथील क्रांती चौक परिसरात होणार आहे. या महोत्सवात अकोला येथील रामायणाचार्य संजयमहाराज पाचपोर आपल्या सुमधूर अशा वाणीतून व ओघवत्या शैलीतून संगीतमय श्रीरामकथा सांगणार आहेत. या महोत्सवास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केले.










