बिडी बंडलांवर 85 टक्के धोकाचित्र छापणे बंद करा या कारणास्तव विडीकारखानदार सरकारमधील वादावर तोडगा काढून विडी कामगारांचा प्रश्न शुक्रवार...
बिडी बंडलांवर 85 टक्के धोकाचित्र छापणे बंद करा या कारणास्तव विडीकारखानदार सरकारमधील वादावर तोडगा काढून विडी कामगारांचा प्रश्न शुक्रवारपर्यंत (२२ एप्रिल) सोडवा, अन्यथा खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर शुक्रवारी रात्रभर भजन करण्याचा निर्धार विडी कामगारांनी रविवारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयासमोर विडी कामगार संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेतर्फे रविवारी पालकमंत्री शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर बैठक घेण्यात आली. विडी कामगारांचे नेते शंकर न्यालपेल्ली, नगरसेवक मनोज दुलम, धनंजय जाधव, निखील वारे, श्रीपाद छिंदम, अॅड. सुधीर टोकेकर, सुभाष लांडे, बापू कानवडे, शंकरराव मंगलारप आदी उपस्थित होते. बैठकीत कारखाने सुरू न झाल्यास शुक्रवारी सायंकाळी वाजता खासदार गांधींच्या निवासस्थानासमोर रात्रभर भजन करून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.










