अहमदनगर : कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला. कार्य़क्रमात रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी तसे...
अहमदनगर : कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला. कार्य़क्रमात रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपलब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी असून यातून ग्रामीण भागातील स्वच्छतेची समस्याही मार्गी लागू शकते. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करीत असून जास्तीत शेतकर्यांनी या सेंद्रीय शेतीकडे वळावे तसेच अपांपरिक उर्जेचा वापर वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केले.
अ.नगर जिल्हा परिषद, कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे सभागृहात शेतकर्यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्ग व अपारंपरिक उर्जा माहिती जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षा गुंड बोलत होत्या. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा, जि.प.सभापती शरद नवले, बाबासाहेब दिघे, मिरा चकोर, विद्यापीठाचे डॉ.किरण कोकाटे, डॉ.आनंद सोळंके आदी उपस्थित हो










