नगर- आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.विक्रम देवचक्के यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. आयुष्यभर गुणे आयुर्वेद महाविद्यालय...
नगर- आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.विक्रम देवचक्के यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. आयुष्यभर गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या उन्नत्तीसाठी त्यांनी योगदान दिले. स्व.डॉ.देवचक्के यांना आयुर्वेद रुग्णालय, महाविद्यालय व आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्यावतीने सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संगीता निंबाळकर, संचालक अरविंद शिंदे, वैशाली ससे, ज्ञानेश्वर रासकर, इलियास जहागिरदार, ठाकूर नवलानी आदि यावेळी उपस्थित होते.









