पारनेर - प.पु. सद गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे नातु ,प.पु. सद्गुरू किसन बाबा चौरे यांचा बारावा पुण्यतिथी सोहळा मंगळवार दि. 0५/०...
पारनेर - प.पु. सद गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे नातु ,प.पु. सद्गुरू किसन बाबा चौरे यांचा बारावा पुण्यतिथी सोहळा मंगळवार दि. 0५/०४/२०१६ रोजी पारनेर येथे आत्मज्ञानी गणपत बाबा मठात संपन्न होत आहे, त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी १२ ते २ वा. पारखपदी सस्तंग, दुपारी २ ते ६ वा. पारनेर शहरातुन सदगुरु प्रतीमेची ढोलकी, डफ, तुनतुने व भेदीक भजनाच्या गजरात पारनेर बाजरपेठेतुन मीरवणूक निघनार आसुन सायं ६ ते ७ वा सदगुरू पादुकांचे पुजन कार्यक्रमस्थळी आत्मज्ञानी गणपत बाबा मठ जामगाव रोड येथे होईल व सायं. ७ ते ८ वा. महाप्रसादा आयोजन करण्यात आलेले आहे. व रात्री ८ ते सकाळ पर्यंत कलगी व तुऱ्याचे अनेक मान्यवर शाहीरांचा आध्यात्मीक प्रभोधनपर भेदीक गायनाचा व सवाल जवाबाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी सत्य अविनाश पारख पद समाजातील पारनेर तालुकयासह अहमदनगर. पुणे, राधानगरी, सांगली, कोल्हापुर सह अनेक जिल्ह्यतुन शाहीर मंडळासह विवीध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थीत राहनार आहेत. तेंव्हा सदगुरू सेवेचा व परमार्थीक सुखाचा लाभ घेवा ही विनंती प. पु. सदगुरू बबनदादा चौरे व जेष्ठ समाज प्रबोधनकार शाहीर निजामभाई शेख व समस्त सत्य अविनाश पारख पद समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.










