नगर- दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली. पहिल्या घटनेतील मुले शेवगा...
नगर- दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली. पहिल्या घटनेतील मुले शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते. तर दुसर्या घटनेतील तरुण कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उन्हाळी सुट्टय़ा असल्याने अक्षय रामेश्वर झुंबड, अक्षय बाळासाहेब मगर (वय १८) व विशाल प्रकाश मगर (वय १४) ही तीन शाळकरी मुले माळरानावर गुरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, राक्षी-कुरुडगाव रस्त्यावरील रामनाथ काळे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी हे मुले उतरले. परंतु तिघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील अक्षय झुंबड व अक्षय मगर हे दोघे पाण्यात बुडाले. तर तेथे जमलेल्या लोकांनी दोर सोडून विशाल मगर याला कसेबसे शेततळ्याबाहेर काढले. अत्यवस्थ असलेल्या विशाल यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. बहिणीच्या लग्नासाठी नोकरीच्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या दोन सख्या भावांचा विहिरीत पोहोताना मृत्यू झाल्याची घटना राक्षी येथे घडलेल्या या दुर्घटनेतील मयत अक्षय झुंबड, अक्षय मगर या दोघांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांना जीव गमवावा लागला. हे दोघेही आई-वडिलांना एकुलते एक होते.










