अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्यांची बदली प्रक्रिया राबवण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. शुक्रवारी ग्रामविकास विभागाने कर्मचा-य...
अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्यांची बदली प्रक्रिया राबवण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. शुक्रवारी ग्रामविकास विभागाने कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेचा कालावधी निश्चित केला असून जिल्हास्तरावर ५ ते १५ मे दरम्यान आणि तालुकास्तरावर १६ ते १५ मे दरम्यान बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वाधिक बदल्या नेहमीप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या होणार आहेत. एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचा-यांना बदली प्रक्रिया संदर्भात शासन आदेशाची प्रतीक्षा असते. यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने ग्रामविकास कर्मचार्यांच्या बदल्या टळतील, अशी अपेक्षा कर्मचा-यांना होती. प्रशासन देखील बदल्यांबाबत संभ्रमावस्थेत होते. यामुळे सेवाज्येष्ठता याद्या अद्ययावत
करण्यापलीकडे फारशी प्रक्रिया झालेली नव्हती. मात्र, शुक्रवारी ग्रामविकास विभागाच्यावतीने कर्मचार्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर ५ ते १५ मे दरम्यान आणि तालुकास्तरावर १५ ते १६ मे दरम्यान बदल्यांची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी बदली प्रक्रियेबाबत बोलताना स्पष्ट केले की, बदलीपात्र कर्मचार्यांचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. आधी पेसा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करुन त्यानंतर विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावर बदली प्रक्रिया पार पडणार आहे. यात सर्वांत किचकट प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाची आहे.गेल्या वर्षी १२ हजार शिक्षकांपैकी ९ हजारांहून अधिक कर्मचा-यांनी बदल्यांसाठी अर्ज केला होता.










