नगर- नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त गुंडेगाव ता.नगर य...
नगर- नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त गुंडेगाव ता.नगर येथील ह.भ.प. भिवसेन महाराज हराळ यांना राज्यस्तरीय ज्ञानमाऊली पुरस्कार नुकताच उद्योजक विलासराव लामखडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्या उज्वलाताई कापसे या होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, नगर तालुका तालीम संघाचे सचिव पै.बाळु भापकर, संस्थेच्या सचिव सौ. मंदाताई डोंगरे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दळवी, उद्योजक संतोष कापसे आदि उपस्थित होते.










