नगर - मंदार साबळे यांनी लिहिलेल्या रामनाम या गीताच्या सीडीचे प्रकाशन रामनवमीच्या निमित्ताने हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव सुनिल रामदासी, स...
नगर - मंदार साबळे यांनी लिहिलेल्या रामनाम या गीताच्या सीडीचे प्रकाशन रामनवमीच्या निमित्ताने हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव सुनिल रामदासी, स्थायीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते रामदासी यांच्या राममंदिरात करण्यात आले. यावेळी तबलावादक प्रसाद सुवर्णपाठकी व मंदार साबळे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना रामदासी यांनी ही गीत रचना अतिशय सुंदर असून यात रामनामाचे महत्व उद्धृत केले आहे. ही भाविकांना आनंद देणारी गीत रचना असल्याचे ते म्हणाले कुलकर्णी यांनी नगरमधून असे नवोिदत कलाकार घडत असून त्यांच्या सत्तेमुळे नगरचे नाव निश्चितच मोठे होण्यास मदत होत अाहे. हे सांगून त्यांनी साबळे यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या या गीताची रचना व संगीत मंदार साबळे यांचे असून स्वर कल्याण मुरकुटे यांनी दिला आहे. हे गीत रामन वमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी भाविकांसाठी रामनाम रामनाम अहमदनगर या नावाने थु दुवर ही पहाण्यासाठी उपलब्ध होणार आहे.










