नगर- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येणार्या बाल रुग्णांना व नवजात शिशूंना अजून चांगली तत्पर व अत्याधुनिक सेवा मिळावी, या उद्देशाने या हॉस्पि...
नगर- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येणार्या बाल रुग्णांना व नवजात शिशूंना अजून चांगली तत्पर व अत्याधुनिक सेवा मिळावी, या उद्देशाने या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाचे स्थलांतर व नूतनीकरण हॉस्पिटलच्या जवळील आनंदऋषीजी ब्लड बँकेमध्ये करण्यात आले आहे. या विभागासाठी नगरमधील सौ.जतनबाई माणकचंदजी बोथरा (पारस नांगर) परिवाराचे योगदान लाभले आहे. फित कापून या विभागाचे उद्घाटन माणकचंदजी बोथरा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सूर्यकांत भटेवडा, पुणे, फुलचंदजी बाठीया, पेमराज बोथरा, संतोष व सतीश बोथरा, सौ.चंचल भाटिया, सौ.मंगला रुणवाल, सौ.संगीता बोथरा, कुंदन कांकरिया, निखिलेंद्र लोढा, डॉ.आशिष भंडारी, डॉ.वैभवी वंजारे आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.










