Archive Pages Design$type=blogging

यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष करत मिरवणूक

राहुरी - शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराय महाराज यात्रोत्सवास रविवारी सुरुवात झाली चार दिवस संपन्न होणाऱ्या यात्रोत्सवाचा पहिल्या दि...



राहुरी - शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराय महाराज यात्रोत्सवास रविवारी सुरुवात झाली चार दिवस संपन्न होणाऱ्या यात्रोत्सवाचा पहिल्या दिवशी श्री क्षेत्र पुणतांबे येथून भाविकभक्तांनी कावडीने आणलेल्या गंगाजल व कावड्यांची खळवाडी येथून वाजतगाजत भंडारा उधळत यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष करत मिरवणूक स्टेशन रोड मार्गे शनिचौक शिवाजी चौक जुनीपेठ शुक्लेश्वर चौक कानिफनाथ चौक या मुख्यमार्गाने बालाजी मंदिराच्या समोरुन निघालेल्या कावडीची मिरवणूक पाहण्यास भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती कावडमिरवणूक बालाजी मंदिराच्या समोर नगरमनमाड रस्त्याच्या बाजूने मंदीराकडे जात असताना महीलांनी आपल्या लहान मुलांना कावड्यांच्या समोर ठेवून दर्शन करविले शहर यावेळी भंडार्याच्या उधळणीत न्हावून निघाले देवाला गंगाजलाने अभिषेक घालण्यात आला व मुख्ययात्रेस प्रारंभ झाला यानंतर मंदीर परिसरात महाभंडार्याचे आयोजन करण्यात येवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दुपारी चारनंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमात भगत दामु शेटे यांनी कंबरेला दोर बांधून जयमल्हारचा उद्घोष करत भाविकांनी भरलेल्या गाड्या जुण्या कोर्टाच्या समोरुन मंदीर परीसरापर्यंत ओढत नेल्या दिवसभर जागरण गोंधळ व खंडेराय महाराजांच्या जयघोषाने व भाविक भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता देवस्थान कमेटीचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे चोख व्यवस्था करण्यात आली होती यात्रा कमेटीचे अध्यक्ष सोन्याबापू जगधने,उपाध्यक्ष तोडमल नितिन तनपुरे राजेंद्र वाडेकर,सुरेश वराळे आदिंसह यात्राउत्सव समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते,खंडेराय मंदिराचा परिसर हारफुलांची भंडारा खोबरे याची दुकाने,रहाटगाडगे खेळणी पाळणे विविध साहीत्यांच्या दुकानांनी गजबजून गेला यात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम रात्री छबीना मिरवणूक शोभेचे दारुकाम मनोरंजन याने पहिल् दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष करत मिरवणूक
यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष करत मिरवणूक
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_152.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_152.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago