पारनेर: मायेमुळे माणसाच्या आयुष्यात विविध प्रश्न निर्माण होतात. माया कायम वाढत जाणारी आहे. सत्याची जाणीव होणे व सत्याचा स्वीकार करणे,...
पारनेर: मायेमुळे माणसाच्या आयुष्यात विविध प्रश्न निर्माण होतात. माया कायम वाढत जाणारी आहे. सत्याची जाणीव होणे व सत्याचा स्वीकार करणे, हे सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडचे आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी केले.
मळगंगा डेअरी फार्म (कन्हैय्या दूध) या संस्थेच्या १९ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त निघोज (ता. पारनेर)येथे आयोजित 'कीर्तन महोत्सव २0१६' मध्ये बुधवारी सहावे पुष्प गुंफतांना संत निळोबारायांच्या अभंगाचे निरुपण करताना कदम महाराज बोलत होते.
कदम महाराज म्हणाले, अनेकदा माणसाला सत्य काय आहे, याचा उलगडा होत नाही. मात्र, मायेच्या प्रभावामुळे तो सत्याचा लवकर स्वीकार करीत नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्यावर प्रेम करीत नाही, तोपर्यंत दुसरा माणुसही आपल्यावर प्रेम करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने प्रथम दुसऱ्यावर प्रेम करण्यास शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी उद्योजक शांताराम लंके, बबन लंके, उद्योजक मच्छिंद्र लंके, निघोजचे माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, मिठू कवाद, भाऊसाहेब उचाळे, रोहिदास कौठाळे, गजानन सोमवंशी तसेच परिसरातील मान्यवर, भाविक मोठय़ा संख्येने हजर होते. या सप्ताहामुळे निघोज भक्तिमय झाले आहे.










