अहमदनगर - जिल्हा कार्यक्षेत्र असलेली व वीज कंपन्यातील तांत्रिक कामगारांपासून अभियंते सभासद असलेली आणि शेवगांव येथे मुख्यालय असणाऱ्या वीज क...

अहमदनगर - जिल्हा कार्यक्षेत्र असलेली व वीज कंपन्यातील तांत्रिक कामगारांपासून अभियंते सभासद असलेली आणि शेवगांव येथे मुख्यालय असणाऱ्या वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्या. शेवगांव या संस्थेवर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना व महाराष्ट्र वीज कामगर महासंघ पुरस्कृत गेल्या 20 वर्षापासूनची सदिच्छा मंडळाची सत्ता अविरोध निवडणूक होऊन कायम राहिली आणि सदिच्छा मंडळाचे 17 उमेदवार अविरोध निवडून आले.
संस्थेच्या सन 2016 ते 2021 या कालावधीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 106 उमेदवारी अर्ज सादर केले होते. छाननी नंतर 101 उमेदवार राहिले.
सदिच्छा मंडळाचे अविरोध निवडून आलेले उमेदवार - अशोक पांडुरंग पाथरकर-शेवगांव, माधव कारभारी पटारे-शेवगांव, सुरेश रावसाहेब लवांडे-पाथर्डी, भाऊसाहेब बाबासाहेब भाकरे-नेवासा, नंदकिशोर मुरलीधर राऊत-जामखेड, संतोष आत्माराम जगताप-कर्जत, सचिन पोपट मुळे-श्रीगोंदा, शिवाजी रामदास चितळकर-पारनेर, प्रविण ज्ञानदेव जठार-अ.नगर, अशोक हरिश्चंद्र साळंके-अ.नगर, सावित्रराव रावसाहेब रोहोकले-बाभळेश्वर/पारेषण, विजय गोविंद ढवण-संगमनेर/श्रीरामपूर, शामराव चंद्रभान मेने-अनु.जा.ज., श्री.संजय बन्सी दुधाने-वि.जा.भ.ज., अमोल गोरक्षनाथ गारुडकर-इ.मागास प्रवर्ग, मनिषा नंदकुमार पाठक-महिला राखीव, श्रीमती सुशिला लक्ष्मण तेलोरे-महिला राखीव









