पारनेर : विवाहित महिलेला जबर मारहाण करून अत्याचार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुम...
पारनेर : विवाहित महिलेला जबर मारहाण करून अत्याचार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार बबन भगवंत पानसरे (रा. कान्हूरपठार) यांनी सोमवारी दुपारी लाकडी दांडक्याने उजव्या मांडीवर, पाठीवर मारहाण करून अत्याचार केला. तसेच पती, मुलाला मारून खानदान संपविण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी बबन पानसरे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. बबन पानसरे हे कान्हूरपठारमधील प्रतिष्ठीत व्यक्ती असून, त्यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत त्यांना अटक झालेली नव्हती.










