नगर- आगरकर मळा येथे उज्वल महिला संस्थेच्यावतीने विरंगुळा मैदान येथे आयोजित आनंदमेळ्याचे उद्घाटन अनिकेत ज्वेलर्सचे संचालक दिगंबर बागडे य...
नगर- आगरकर मळा येथे उज्वल महिला संस्थेच्यावतीने विरंगुळा मैदान येथे आयोजित आनंदमेळ्याचे उद्घाटन अनिकेत ज्वेलर्सचे संचालक दिगंबर बागडे यांच्या हस्ते झाले. मंडळाच्या अध्यक्षा माजी उपमहापौर गितांलजी काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नगरमधील विविध घरगुती उद्योजकांचे 30 ते 40 स्टॉल लावण्यात आले होते. स्टेशन रोड व नगर शहर परिसरातील चोखंदळ ग्राहकांनी या आनंद मेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.










