राहुरी - नेवासा तालुक्यातील शिरेगाव व राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील मुळा नदिपाञात अवैध रीत्या चोरटी वाहतुक करणारे तीन ...
राहुरी - नेवासा तालुक्यातील शिरेगाव व राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील मुळा नदिपाञात अवैध रीत्या चोरटी वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर शिरेगाव-मांजरीतील संतप्त ग्रामस्थानी पेटुन दिल्याने वाळुतस्कारांमधे चांगलीच तारांबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की,शिरेगाव मांजरी हद्दितील मुळा नदीपाञ अवैध चोरटी वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर संतप्त झालेल्या नागरिकांनी पेटुन दिले. ग्रामस्थाचा रूद्र अवतार पाहुन वाळु वाहतुक करणाऱ्यांनी घटनास्थळावरुन धुम ठोकली.सकाळी ही माहीती गावात पसरताच हे बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी झाली होती.
सध्याची दुष्काळजन्य परीस्थिती बघता विहरी व बोअरवेलची पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे या परीसरामधुन वाळु वाहतुकी विरोधात ग्रामस्थानी ग्रामसभेचा वाळु बंदी चा ठराव केला होता. असे असताना ही वाळु वाहुतूक सुरू असताना ग्रामस्थांनी वेळोवेळी या वाळुतस्करांना तोंडी सुचना दिल्या होत्या व महसुल व पोलीस प्रशासनाला अर्ज करुन ही ते या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याने वाळुतस्काराचे मनोबल वाढत चालले होते. विषेश म्हणजे अमरधामातील प्रवेश गेट तोडून या वाळुतस्करांनी आत प्रवेश केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावाना दुखवल्याने आज पहाटेच्या सुमारास संतप्त ग्रामस्थानी हे वाळुवाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर
व टेलर पेटुन दिल्याने वाळुतस्करांना आल्याने त्यांची तारांबळ ऊडाली होती. महसुल व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करुन ही कुठली ही कारवाई न झाल्याने नागरीकांच्या भावाना तीव्र झाल्याने ही घटना घडली.











