अहमदनगर - दि.27 मार्च 2016 रोजी अहमदनगर मूक बधिर असोसि. अ.नगर या संस्थेचे कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य पदाची स न 2016-2020 वर्षाकरीता...
अहमदनगर - दि.27 मार्च 2016 रोजी अहमदनगर मूक बधिर असोसि. अ.नगर या संस्थेचे कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य पदाची स न 2016-2020 वर्षाकरीता निवडणुक होऊन सदर निवडणुकीत अध्यक्षपदी आनंद कडूस, उपाध्यक्ष पदी बबलू बल्लाळ, सचिवपदी प्रमोद बळे, सहसचिवपदी आकाश परभणे, खजिनदार निलेश धोका, कार्य़ाध्यक्ष बाळासाहेब चेमटे, सदस्य राजेंद्र कलगुंडे, समीर पठाण, दिपक जाधव, अजय कोडम, संतोष कर्डीले यांची निवड झाली सदर निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी जयसिंग काळे, सह निवडणुक निर्णय अधिकारी प्रितम मुथा व अॅड.व्यंकटेश शिरसुल यांनी काम पाहिले.
सदर निडवणुकीत एकूण 23 उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यात अध्यक्ष व सचिव वसहसचिव पदी व सदस्यामध्ये नवीन चेहरे आलेले असून त्यामध्ये अजय कोडम, निलेश धोका, राजेंद्र कलगुंडे हे जुने चेहरे राहिले आहेत. तसेच पुर्वीचे अध्यक्ष अजय गांधी, सहसचिव शेखर पांचाळ, कार्याध्यक्ष श्रीनिवास येनगंदुल, खजिनदार साजिद सय्यद, सद्स्य विनायक ढाकणे, उमेश पलंगे हे कार्यकारिणी समितीमधून बाहेर गेले आहेत.










