नेवासा - गेल्या काही वर्षापासून नेवासा शहरात महिलांसाठी स्वच्छता गृह नाहीत. नेवासा शहरातील ग्रामपंचायत कार्यालय समोरील बाजूस असलेल्या...
नेवासा - गेल्या काही वर्षापासून नेवासा शहरात महिलांसाठी स्वच्छता गृह नाहीत. नेवासा शहरातील ग्रामपंचायत कार्यालय समोरील बाजूस असलेल्या शौचालय, स्वच्छता गृहांची आणि बाजारतळ वरील शौचालय, स्वच्छता गृहांची दुरूस्ती लोकवर्गणीतून केली जाणार असून त्यासाठी लोकवर्गणी गोळा केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, विकास चव्हाण यांच्या पुढाकाराने लोकवर्गणी गोळा करून हे काम होणार आहे. नेवासा बस स्थानका वरील, बाजारतळ वरील, ग्रामपंचायत कार्यालय शेजारील, शौचालय, स्वच्छता गृह गेल्या काही वर्षापासून महिलांसाठी आणि पुरुषांनसाठी उपयोगी नाही, त्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाला आहे त्यामुळे वास येत असल्याने महिलांना नाक दाबून लघू शंकेला जावे लागते.
त्या करिता नेवासा शहरात फलक लावून लोकवर्गणी गोळा करण्यासाठी मदत होत असल्याने त्या कामाचे उद्घाटन नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, बाळासाहेब पाटील, यांच्या सह आदींच्या हस्ते नारळ फोडून, फित कापून उद्घाटन करण्यात आले.
काही दिवसात या दोन्ही ठिकाणी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कडून 15 बाय 15 चे शौचालय दिली जाणार आहे.










