श्रीगोंदा - अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रवेशद्वारा समोरुन प्रशांत तुकाराम बोरुडे या शिक्षकाच्या दूचाकीच्या डीकीतून एक लाख रुपये च...
श्रीगोंदा - अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रवेशद्वारा समोरुन प्रशांत तुकाराम बोरुडे या शिक्षकाच्या दूचाकीच्या डीकीतून एक लाख रुपये चोरुन नेल्याची घटना आज शनिवार दि. 2 एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, शाळा इमारत दुरुस्ती बांधकामासाठी जि.प.कडून मंजूर झालेले 2 लाख 15 हजार रुपयामधून एक लाख 1 हजार 889 रुपयांचा चेक घेऊन शिक्षक प्रशांत बोरुडे 11.45 वा. ए.डी.सी.सी. बँकेत आले. बँकेतून त्यांनी कॅशीयर कडून पैसे मोजून घेतले. त्यातून एक लाख रुपये लाल रंगाच्या कापडी पिशवीत ठेऊन उर्वरीत पैसे त्यांनी पँटच्या खिशामध्ये ठेवले व बँकेच्या प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेव्हा समोर पाण्याचे दोन टँकरवजा वाहने उभी होती व दोन दुचाकीही होत्या. बोरुडे यांना बाहेर येण्यासाठी पूर्ण जागा नसल्याने ते थोडो थबकले तेवढ्यात काळ्या रंगाच्या पल्सवरवर बसलेले दोन अठरा ते वीस वयोगटातील तरुण त्यांचेजवळ आले. त्यातील मागे बसलेल्या तरुणाने बोरुडे यांच्या दूचाकीच्या डिकीतील पैशाची कापडी पिशवी गुपचुप उचलली व समोर निघण्यासाठी तयार असलेल्या पल्सरवर स्वार होऊन ते दोघे निघून गेले. बोरुडेंच्या हे लागलीच लक्षात आले त्यांनी पाठलाग केला मात्र पल्सरचा वेग जास्त असल्याने त्यांना पल्सर गाठता आली नाही. ते जोरात ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र कोणाला ऐकू आले की नाही हे माहित नाही मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. बोरुडे यांनी महेबूब बँडवाले पुढे कन्या शाळा व त्यानंतर सावता मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. पिशवी उचलणाऱ्या युवकाने राखाडी रंगाचा शर्ट व डोक्यावर उन्हाची काळी टोपी घालता होती. त्यामुळे ते त्याचा चेहरा पाहू शकले नाहीत मात्र भरदुपारी ही लाखभर रुपये पळवण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पाळत ठेऊन हे काम केले असल्याचे बोलले जाते. श्रीगोंदा पोलीसात याबाबत फिर्याद दिली असून अधिक तपास पो.स.ई. उकीर्डे हे करीत आहेत.










