लातूर - दुष्काळी भाग म्हणून अोळखल्या जाणाऱ्या लातूर भागातील जलस्वराज अभियानातील कामाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेतल्याच्या प्रकारावरुन ...
लातूर - दुष्काळी भाग म्हणून अोळखल्या जाणाऱ्या लातूर भागातील जलस्वराज अभियानातील कामाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेतल्याच्या प्रकारावरुन महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागात त्यांनी केलेला हा प्रकार भाजपच्या नेत्यांनाही याेग्य वाटला नाही. पुन्हा वादग्रस्त प्रकार करू नका, अशी तंबी भाजपकडून मुंडे यांना देण्यात अाली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली.
याआधीही महिलांच्या शनि मंदिराच्या चौथऱ्यावरच्या प्रवेशाबाबत त्यांनी केलेले विधान खूप वादग्रस्त ठरले. त्याचे पडसाद दिल्लीत उमटले. भाजप मुख्यालयातही त्यावर नाराजी व्यक्त झाली. पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये सेल्फी काढल्यानंतर साेशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्यात. दिल्लीतही पंकजा मुंडे चर्चेचा विषय ठरल्या अाहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अाणि महाराष्ट्राचे प्रभारी माेहन प्रकाश यांनी यावर बोलताना यातून पंकजा मुंडे यांची क्रूर संवेदनहीनता दिसून अाली. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असाच अाहे अशी परखड टीकाही टिकाही करण्यात आली. मराठवाड्यातील पाण्याच्या दुष्काळाबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात काँग्रेसने हा प्रश्न लावून धरला हाेता परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. माेदी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेत पेयजलाची व्यवस्था करणे ही बाब नाही, अशी प्रतिक्रिया दिली. पंकजांच्या सेल्फीबाबत निर्मला सीतारमन यांना विचारले असता त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी या विषयाला बगल देत केंद्र अाणि राज्य सरकार लातूरच्या नागरिकांना पाणी मिळावे यासाठी भगीरथ प्रयत्न करीत अाहेत. रेल्वेने तातडीने पाणी पाेहोचविण्यात अाले. लाेकांपर्यंत पाणी पाेहोचविण्यात भाजप सरकार कुठेही कमी पडले नाही. लाेकांनीसुद्धा सेल्फीचा विषय साेडून द्यायला पाहिजे असेहि मत त्यांनी व्यक्त केले.










