नगर- शेतकर्यांचे विशेषत: उस उत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान करणार्या हुमणी अळीवर लखनौच्या भारतीय उस संशोधन केंद्राद्वारे विकसित आण...
नगर- शेतकर्यांचे विशेषत: उस उत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान करणार्या हुमणी अळीवर लखनौच्या भारतीय उस संशोधन केंद्राद्वारे विकसित आणि पुण्याच्या फाइन ट्रॅप द्वारा देशभर वितरीत होणारे कोम्बो ट्रॅप हे अक्षरश: वरदान ठरले आहे. फाइन ट्रॅप कंपनीद्वारे नगर जिल्ह्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांसह महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आदि साखर पट्ट्यातील प्रमुख भागात कॉम्बो ट्रॅपचे नि:शुल्क (प्रात्यक्षिक) डेमोन्स्ट्रेशन केले होते. विषारी रसायने- किटक नाशक औषधांना दाद न देणारा हा महाभयंकर हुमणीचा किटक या लाईट ट्रॅप व फेरोमन ट्रॅपच्या एकत्रिकरणातून संशोधित केलेल्या कोम्बो ट्रॅपमध्ये मात्र सहजपणे अडकल्याचे प्रात्यक्षिकात स्पष्ट झाले. असून आता सर्वच कारखान्यातून शेतकरी या कोम्बो ट्रॅपची मागणी करु लागला आहे.
लखनौच्या भारतीय उस संशोधन केंद्राने विकसीत केलेले कोम्बो ट्रॅप हे उपकरण पुण्याच्या फाइन ट्रॅप मार्केटींग द्वारे शेतकर्यांना वितरित केले जाते. अवघे 1500 रु. किंमत असलेला हा कोम्बो ट्रॅप हा उसावरील हुमणी व इतर किटकांसाठी अत्यंत प्रभावशाली उपकरण ठरला आहे. या कोम्बो ट्रॅपमुळे शेतकर्यांचे एकरी 10 ते 15 टन उत्पादन वाढतांनाच रसशोषक किटकांचा बंदोबस्त यामुळे होत असल्याने उसाचा उताराही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि सर्वात महत्वाचे हुमाणी अळीच्या बंदोबस्तासाठी सध्या कुठलाच उपाय नसल्याने शेतकरी विषारी आणि महागडी औषधांची फवारणी करतो; मात्र ही औषधे उसाच्या मुळाशी असलेल्या आणि आतुन उस पोखरणार्या हुमणी अळीपर्यंत पोहचतच नसल्याने या विषारी औषधांचे दुष्परिणाम आणि फवारणीचा खर्च नहाक शेतकर्याच्या माथी पडतो. आता या कोम्बो ट्रॅपमुळे फवारणीची गरजच राहणार नसल्याने फवारणीचा खर्च वाचतांनाच फवारणीमुळे पिकावर आणि माणसांवर होणारे दुष्परिणामही टळतात.
फाइन ट्रॅप कंपनीने सर्व साखर कारखान्यांना पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे कारखान्यांनीच शेतकर्यांना हे उपकरण लावण्यासाठी सहकार्य करावे. हुमणी अळीमुळे होणार्या प्रचंड नुकसानीबाबत जागृती आणि मार्गदर्शनासाठी शेतकरी मेळावे आयोजित केल्यास फाइन ट्रप कंपनी सर्व सहकार्य करेल. शेतकर्यांनी आणि कारखान्यांनी या कोम्बो ट्रॅपचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन फाइन ट्रॅपचे मुख्य संचालक श्री.राजुभाई रुपारेलिया यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
फाईन ट्रॅपसाठी संपर्क - ऑफीस नं.3/4, दुसरा मजला, 1, संगम कमर्शियल कॉम्प्लेस, आरटीओजवळ, पुणे 001. मो. 9168332309, 9130068263










