नगर - नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शइल कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे. या सं...
नगर - नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शइल कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे. या संस्थेने शिक्षण क्षेत्रात चांगला ठसा उमटविला आहे. विविध स्पर्धांत सहभागी होऊन कॉलेजने नावलौकिक मिळविला आहे. हा नावलौकिक वाढविण्यासाठी व शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च शिखर विद्यार्थ्यांनी गाठावे, यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन रेसिडेन्शइल कॉलेजचे नूतन उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सुर्वे यांनी केले.
रेसिडेन्शइल कॉलेजच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा प्राध्यापकांच्या वतीने प्रा. सीमा जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारास उत्तर देताना प्रा. सुर्वे बोलत होते.
याप्रसंगी प्रा. सीताराम काकडे, प्रा. दादासाहेब वांढेकर, प्रा. दिलीप मगर, प्रा. अनिल काळे, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. कैलास गोरे, प्रा. मोहन कांजवणे, प्रा. संगीता ठुबे, प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. सगळगिळे, प्रा. एस. जी. घंगाळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.










