नगर : भगवान बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल...
नगर : भगवान बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल्प जय भगवानबाबा महासंघाने घेतला आहे. यासाठी राज्यात बाबांची १११ मंदिरे बांधण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ३८ मंदिरांची उभारणी झालेली आहे. तालुक्यातील शहापूर येथे ३९ व्या मंदिराच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हभप रामगिरी महाराज, हभप दत्त दिगंबर महाराज, महासंघाचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, उद्योजक बाबूशेठ नागरगोजे आदी उपस्थित होते.
सानप म्हणाले की, जिल्ह्यात महासंघाचे काम भिमराज आव्हाड यांच्यावर सोपवले असल्याने ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महासंघ स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहापूर येथील मंदिराच्या कामासाठी स्वत:चे १ लाख ११ हजार १११ रुपये देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मंदिरातील बाबांच्या मूर्तीसाठी नागरगोजे योगदान देणार आहेत. शहापूरचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव काळे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट देण्याचा संकल्प केला असल्याचे सानप यांनी यावेळी जाहीर केले.










