नगर - पुणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता प्रशासक यांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडीच्या डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरण...
नगर - पुणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता प्रशासक यांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडीच्या डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरणातून शनिवारी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल. पुणे, नगर, सोलापूर बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तसेच विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत झालेल्या नियोजनानुसार पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
पण हे पाणी फक्त पिण्यासाठीच सोडण्यात येणार आहे. शेवटच्या भागातील करमाळा कर्जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे उद््भव भरल्यानंतर श्रीगोंदे, पारनेर तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे उद््भव भरण्याचे नियोजन आहे. शेवटच्या टप्प्यात आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील उद््भव भरण्यात येतील. पिण्याच्या पाण्याशिवाय अन्य वापरासाठी बेकायदेशीरपणे पाणी घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कमी पावसामुळे कुकडी प्रकल्पात यंदा केवळ ४९ टक्के इतकाच साठा होऊ शकला. त्यातून रब्बी हंगामात शेतीसाठी पिण्यासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते.










