नगर- महिलांना धार्मिकस्थळी जाण्यास रोखता येणार नाही, हा न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह व अभिनंदनीय असाच असून, आज शनी शिंगणापुर येथे खा...
नगर- महिलांना धार्मिकस्थळी जाण्यास रोखता येणार नाही, हा न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह व अभिनंदनीय असाच असून, आज शनी शिंगणापुर येथे खास दर्शनासाठी चौथर्यावर जाणार होतो, परंतु शनी मंदिराच्या ट्रस्टींच्या विनंतीनुसार हा दर्शनाचा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. मात्र जास्त काळ आम्ही महिला दर्शनासाठी थांबणार नाही, याचेही भान ट्रस्टींनी ठेवावे, असे उद्गार याप्रसंगी काढले.
राष्ट्रवादीच्या नगर येथील कार्यालयास त्यांनी आज सदिच्छा भेट दिली असता, त्या बोलत होत्या. महापौर अभिषेक कळमकर यांनी सौ.चित्रा वाघ यांचे स्वागत केले. याप्रसंगी सोमनाथ धूत, जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड, निर्मला मालपानी, रेश्माताई आठरे, साधना बोरुडे आदिंसह मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होत्या.









