नगर - जिज्ञासाकरिअर अॅकॅडमी ज्ञानसागर फाउंडेशनच्या वतीने अंध अपंगांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे व्यवसायाभिमुख मार्गदर्शन देण्यात येणा...
नगर - जिज्ञासाकरिअर अॅकॅडमी ज्ञानसागर फाउंडेशनच्या वतीने अंध अपंगांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे व्यवसायाभिमुख मार्गदर्शन देण्यात येणार आहे. एमपीएससी, बँकिंग स्टाफ सिलेक्शनच्या तयारीबाबत त्यांना प्रेरित केले जाणार आहे, अशी माहिती जिज्ञासा करिअर अॅकॅडमीचे संचालक किशोर रक्ताटे यांनी दिली. जिज्ञासा अॅकॅडमीच्या मनमाड रस्त्यावरील आदेश प्लाझा इमारतीतील नूतन कार्यालयात सोमवारपासून हे प्रशिक्षण सुरु होत आहे. शनिवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या बॅचचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये सहभागी होत असलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभियानाचे उपक्रमांचाही लाभ मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरुप याविषयी मार्गदर्शन केले जाईल.










