नगर - अहमदनगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी दिगंबर महादेव गोरे (काका) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू ...
नगर - अहमदनगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी दिगंबर महादेव गोरे (काका) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 79 वर्षांचे होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कै.गोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. मनपाचे कर्मचारी राजेंद्र व नितीन गोरे यांचे ते वडिल होत.










