नगर - महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक, समाज हितचिंतक श्रेष्ठ कृतिशिल असे होते. समाजातील विषमता, जाती भेद, वर्ण, द्वेष, गुलाम ग...
नगर - महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक, समाज हितचिंतक श्रेष्ठ कृतिशिल असे होते. समाजातील विषमता, जाती भेद, वर्ण, द्वेष, गुलाम गिरी या कर्मठ प्रवृत्तीशी त्यांनी लढा दिला. दिनदुबळ्याचा विकास हा शिक्षणा शिवाय होणार नाही. हे त्यांनी ओळखले होते. स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेळ त्यांनी रोवली. स्वत:ची पत्नी सावित्रीबाईंना शिकवुन त्यांना शिक्षिका केले. 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. तसेच बाल विवाह, सती प्रथा, भु्रणहत्या या सामाजात रुढ होत्या. या नष्ठ करण्यासाठी त्यांनी सामाजाचे प्रबोधन केले. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. जगाला मानवता धर्म सांगितला. मानवाची सेवा व स्वातंत्र्याचे रक्षण हिच खरी ईश्वर सेवा आहे. या थोर समाज सुधारकास भारतरत्न देण्यात यावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजू शेख यांनी केले.
माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले जंयती निमित्त मर्.फुले यांच्या पुतळ्यास मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युनूसभाई तांबटकर, राजूभाई शेख, आबीद खान, लर्तिें तांबोळी, आर्सिें खान, शौकत सय्यद, बहिरनाथ वाकळे, अभिजित वाघ, दत्ता वडवणीकर, महेश पठारे, रोहित वाळके, आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी थोर समाजसुधाकर महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.










