नगर - कमी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. आगामी अडीच महिन्यांत पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरने ...
नगर - कमी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. आगामी अडीच महिन्यांत पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवण्यासाठी तब्बल २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन आखले आहे. टंचाई निवारणासाठी २९ कोटी ६६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील कोटी वगळता उर्वरित रक्कम केवळ टँकरवर खर्च केली जाणार आहे.
टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एप्रिल, मे जून महिन्यासाठी २९ कोटी ६६ लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. २६ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद ही केवळ टँकरसाठी करण्यात आली आहे. जूनपर्यंत टँकरची संख्या ७०० हून अधिक होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने ही तरतूद केली. कोटी १५ लाख ५० हजार रुपयांची तरतूद नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी करण्यात आली आहे. २२ लाख ५० हजारांची तरतूद तात्पुरत्या उपाययोजना नळपाणी योजनेसाठी लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
रब्बी हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचा सर्वाधिक फटका पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, नगर पारनेर या तालुक्यांना बसला. सन २०१५ मध्ये खरीप हंगामात लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे सर्व पिके जळून गेली. पिके जळून गेलेले बहुतांशी क्षेत्र दक्षिण नगर जिल्ह्यातील आहे. खरीप हंगामात ५८१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. रब्बी हंगामातही तीच स्थिती होती. रब्बी हंगामात ७०० हून अधिक गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे.










