नगर- रोशनी हा अंध कलाकारांचा कार्यक्रम गेली दहा वर्षे देशभर गाजत आहे. मराठी-हिंदी आणि गुजराथी गीते हे कलाकार अतिशय सुमधूर सुरेल आवाजा...
नगर- रोशनी हा अंध कलाकारांचा कार्यक्रम गेली दहा वर्षे देशभर गाजत आहे. मराठी-हिंदी आणि गुजराथी गीते हे कलाकार अतिशय सुमधूर सुरेल आवाजात सादर करतात. देशभर आपल्या भक्तीगीत आणि राष्ट्रभक्तीपर गीतांसह सुमधुर गीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरच्या राष्ट्रीय दृष्टीहीन शिक्षण संघाच्या ‘रोशनी म्युझिकल’ ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम महावीर जयंतीच्या दिनी नगरकरांसाठी सादर होणार आहे. क्लेराब्रुसच्या मैदानावर मंगळवारी सायं. 7.30 वा. हा कार्यक्रम प्रतिष्ठा महोत्सवात सादर होणार असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे. देशातील मान्यवरांनी या अंध कलाकारांची प्रशांसा केली आहे. दीपक चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल.एस.खापेकर यांच्या पुढाकाराने अंध शाळा उभारणीचे काम सुरु आहे. घन:श्याम मेहता यांच्या प्रयत्नातून आणि पुज्य आचार्यश्री जगवल्लभ सुरीश्वरजी, हर्षवल्लभ सुरीश्वरजी आणि पुज्य पंन्यास दर्शनवल्लभजींच्या प्रेरणेतून या संस्थेस मोठे आशिर्वाद आहेत. आतापर्यंत 55 लाख रुपयांचा निधी जमला असून, शाळेचे दोन मजले पूर्ण झाल्याचं घन:श्याम मेहता यांनी सांगितले.










