नगर- मनात आत्मविश्वास, कामावर श्रद्धा व कठोर मेहनतीची तयारी असेल तर आपण पाहिलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरते असे प्रतिपादन ‘चला हवा ...
नगर- मनात आत्मविश्वास, कामावर श्रद्धा व कठोर मेहनतीची तयारी असेल तर आपण पाहिलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरते असे प्रतिपादन ‘चला हवा येऊ द्या’ फेमअभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले.
मंथन पब्लिकेशनच्यावतीने येथील माऊली सभागृहात आयोजित, मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी तथा साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माते दुर्गेश सोनार होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे, नांदेडचे उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतिष बुद्धे, प्रसिद्ध कवयित्री व मुंबई पोलीस रिता जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
गणेशपुरे पुढे म्हणाले की, जगात कुठलीही जादू नाही, जादूने काहीही निर्माण करता येत नाही, मात्र मनात प्रंचड आत्मविश्वास पाहिजे, कामावर श्रद्धा ठेवा, मोठी स्वप्ने पहा व ती सत्यात उतरविण्यासाठी मेहनत घ्या. कारण यशाची शिखरे गाठण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.
अतुल कानडे म्हणाले, की सातत्य, नियोजन व कष्ट या त्रिसुत्रीमुळेच स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होता येते. स्पर्धा परिक्षेत सुरुवातीला अपयश गृहीत धरुनच वाटचाल करावी लागते. त्यामुळे पालकांनी मुलांना त्यांची स्वप्ने जगू घ्यावीत.