Archive Pages Design$type=blogging

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादी दोन गटांत वाद

नगर - सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाणीनगर कॉलनी एकविरा चौकात महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पाइपलाइन रस्त्यावर शिवसेन...


नगर - सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाणीनगर कॉलनी एकविरा चौकात महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पाइपलाइन रस्त्यावर शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटांत भांडणे झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यावरुन पोलिसांनी दरोडा, मारहाण, विनयभंगाचे गुन्हे नोंदवले आहेत. आरोपींमध्ये सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. फिर्यादी देण्यासाठी दोन्ही गटांच्या वतीने मातब्बर नेत्यांनीही पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. 

पहिली फिर्याद राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या पत्नीने दिली. त्या घरी असताना दुपारी बाळासाहेब नानासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक सतीश नानासाहेब बारस्कर, सचिन नानासाहेब बारस्कर, किरण बारस्कर, संकेत पुजारी हे तेथे आले. निवडणुकीतील कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या पतीला, जावेला दिराला मारहाण केली. गळ्याला चाकू लावून सोन्याचे मंगळसूत्र रोकड काढून घेतली. नंतर शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडा, विनयभंग, मारहाण करणे, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. तपास सहायक निरीक्षक राहुल गायकवाड करत आहेत. 

दुसरी फिर्याद विरोधी गटाने दिली आहे. फिर्यादी महिला घरी असताना योगेश ठुबे, शिवाजी डोके, अंकुश चत्तर, तुषार यादव, कुलदीप भिंगारदिवे, गोट्या धाडगे तेथे आले. त्यांनी निवडणुकीच्या कारणावरुन धारदार शस्त्राचा धाक दाखवून विनयभंग केला. शिवीगाळ, दमदाटी मारहाण करत सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडा, मारहाण करणे, विनयभंग, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. या दोन्ही फिर्यादी नोंदवताना पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी जमावाला पांगवले. 

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादी दोन गटांत वाद
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादी दोन गटांत वाद
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPTNwRp29E0TDdfuAofYNqn-vYvFRevaxiU_Af4BvQKXoCNPDgsLONLmiqg9lmGwbY78SI7tqWJV7R7bM3T2XTr4zBb9BjUTqSqfHeHQzkYlvPCQZfYGDqhXyT9_duyyTOX_KfWeMILP0M/s1600/pipeline.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPTNwRp29E0TDdfuAofYNqn-vYvFRevaxiU_Af4BvQKXoCNPDgsLONLmiqg9lmGwbY78SI7tqWJV7R7bM3T2XTr4zBb9BjUTqSqfHeHQzkYlvPCQZfYGDqhXyT9_duyyTOX_KfWeMILP0M/s72-c/pipeline.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_263.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_263.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago