नगर- हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. मंडळाच्या घटनेप्र...
नगर- हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. मंडळाच्या घटनेप्रमाणे निवडणुक अधिकारी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निकाल जाहीर करुन रितसर विजयी उमेदवारांची नावे घोषित करतात. त्याप्रमाणे दादा चौधरी येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुक निर्णय अधिकारी अॅड.सुधीर झरकर यांनी निकाल व विजय उमेदवार घोषित केले. मंडळाचे मावळते अध्यक्ष प्रा.मधुसूदन मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रा.मुळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नुतन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांच्याकडे रितसर सुपूर्द केली. यावेळी नगर, श्रीरामपुर, अकोले, मिरजगांव येथून मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.









