अहमदनगर - येथील चर्चरोड वरील चाँद सुलताना या शाळेत सुमारे १२00 पेक्षा जास्त विद्यार्थी - विद्यार्थिनी असून इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये...
अहमदनगर - येथील चर्चरोड वरील चाँद सुलताना या शाळेत सुमारे १२00 पेक्षा जास्त विद्यार्थी - विद्यार्थिनी असून इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील मुलींची छेडछाड काढणार्या टारगट मुलांचा बंदोबस्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी निवेदन चाँद सुलताना हायस्कूलचे उपाध्यक्ष मन्सुरभाई शेख, प्राध्यापक हुंडेकरी, खलिल सर, सुलेमान सर, इलियास सर यांनी कोतवाली पोलिस स्टेशनचे पीआय सोमनाथ मालकर यांना भेटून दिले.
शाळा भरण्याच्या वेळेस व शाळा सुटण्याच्या वेळेस शाळेबाहेरील काही गुंड प्रवृत्तीची मुले विद्यार्थिनींची छेड काढतात. शाळेमधील प्राध्यापक, शिक्षकांनी त्यांना अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामधील काही मुलांनी हायस्कूलमधील शिक्षकांवर धावून जावून त्यांना शिवीगाळ केली आहे. अशा या टारगट विद्यार्थ्यांचा त्वरीत बंदोबस्त करुन काही दिवस शाळेच्या प्रवेशावेळी आणि सुटण्याच्यावेळी येथे पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.










