Archive Pages Design$type=blogging

महाराष्ट्राच्या मढ्यावर आयपीलएचा नंगानाच

जितके वेढ क्रिकेटने भारताला लावलयं, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक पाण्याने महाराष्ट्राला वेडपिसं केलय. क्रिकेट म्हणजे जीवन नक्कीच नाही...


जितके वेढ क्रिकेटने भारताला लावलयं, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक पाण्याने महाराष्ट्राला वेडपिसं केलय. क्रिकेट म्हणजे जीवन नक्कीच नाही. पण पाण्याशिवाय जीवनच नाही. भविष्यात पाण्यावरुन युध्द होतील असं यापुर्वीच अनेकवेळा भाकीत झालंय. परंतु महाराष्ट्रात सद्य स्थितीमध्ये पाण्यावरुन मारामारी, दंगल घडत आहे. पाण्यासाठी जमावबंदीचा आदेश, पाण्याच्या स्त्रोताजवळ पोलीसांचा फौजफाट्यानिशी बंदोबस्त हे आजचं वास्तव आहे. हंडाभर पाण्यासाठी चार दोन मैलाची पायपीट अन् घोटभर पाण्यासाठी जीवाचं मोल द्यावा लागलं हे याच महाराष्ट्रतील चित्र आहे. केवळ वाडीवस्तीच नव्हे, तर शहरेसुध्दा पाण्याच्या टँकरवर जगत आहे. गावात पाण्याचा टँकर घेऊन येणारा टँकर चालक म्हणजे देवदूतच असं इथल्या जनतेला वाटतंय. टँकर आल्यावरही ते पाणी मिळविण्यासाठी उडणारी झुंबड, त्यात एखादा अवयव मोडणं, कपाळावर पडणारी खोक, मिळणाऱ्या हंडाभर पाण्यापुढे किरकोळ वाटते. धरणसाठे मृतसाठ्यापर्यंत पोहचले. माणसांची ही कथा पण जनावरांची आणखी वेगळीच. डोळ्याासमोर पाण्यासाठी कासावीस झालेली पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली जनावरे पाहतांना, करपणारा शेतमाल पाहतांना, मरणांत यातना भोगणारा हा महाराष्ट्र केवळ एकच टाहो फोडतोयं, कोणी पाणी देता का पाणी? धरणात नाही, तळ्याात नाही, इतकंच काय पण डोळ्याातलंही पाणी आटलं. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हा दिनक्रमच थांबलायं. दिवस अन् रात्रही पाण्यासाठी तिष्ठतांना ना झोपेचं भान, ना कामाचं. हे जळजळीत वास्तव आहे. अशा परिस्थितीत खेळांची मैदाने हिरवीगार ठेवण्यासाठी प्रतिदिन लाखो लीटर पाणी फवारतांना पाहणे म्हणजे भळभळत्या जखमेत मीठ-मीरची भरण्यासारखे आहे. आत्ता परवा परवा म्हणजे सन 2008 च्या आसपास आयपीएल नावाचा खेळ, क्रिकेटच्या लोकप्रियतेचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी जन्माला आला. प्रस्तुत आयपीएल हा क्रिकेट खेळवणारा खेळ असला तरी आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेट असे नाही. ही अनेक तज्ञांची भावना आहे. ती अनाठायी नक्कीच नाही. अगदी तंत्रशुध्द व्यापार असेच त्याचे स्वरुप आहे. अगदी बोली लावून खेळाडू विकत घेण्यापासून त्याची सुरवात होती. प्रत्येक वस्तू व ठिकाणावरील जाहिरातीतून पैसे, खेळाचे प्रसारण, प्रक्षेपण, हक्क विकणे अशाच अनेक माध्यमांतून गडगंज पैसा कमविणे हाच या आयपीएल नामक क्रिकेट खेळाचा उेश दिसतो. कमवलेल्या पैशाचा उपयोग फक्त आणि फक्त क्रिकेटसाठीच वापरायचा हा निर्देशही त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे. असे असले तरी आयपीएल संघाचे मालक, त्यांना मिळणार्‍या पैशाचा विनियोग त्यांच्या स्वत:च्या मर्जीने करण्यास मोकळे असतात. असे असले तरी आयपीएल भरविणार्‍या क्रिकेट संघाने अथवा त्यांच्या मालकांनी क्रिकेटच्या उत्कर्षासाठी काय केले, हा संशोधनाचाच भाग आहे. गेल्या 9 वर्षात एखादा खेळाडू देशासाठी शोधणे किंवा तयार करण्याचे काम केलेले आठवतही नाही. क्रिकेट संघ मालकांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब किंवा दुष्काळी गांवे किंवा एखाद्या गावाचा विकास किंवा गरजवंतांना मदत अशा प्रकारचे एखादे काम केले का, हे शोधूनच पाहिले पाहिजे. अशा तन व्यापारी वृत्तीचा हा खेळ दुष्काळी किंबहुना पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या महाराष्ट्रात का खेळवायचा, हा प्रश्नच आहे. मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनीही असाच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला आहेच. दरम्यान रायातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यातील लग्न सोहळे, समारंभ यावर बंदी घालण्याचा विचार करावा असे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर या खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानांना हिरवेगार ठेवण्यासाठी प्रसिध्द होणाऱ्या आकडेवारी प्रमाणे जवळपास दीड कोटी लीटर पाणी वापरले जात आहे. हे पाणी महाराष्ट्रासाठी लाख मोलाचे आहे. परंतु निर्लज क्रिकेट संस्था म्हणते, हे पाणी आम्ही विकत घेतो त्याचा विनियोग कसा करायचा हा आमचा प्रश्न आहे. शिवाय हे पाणी गरजेच्या ठिकाणी वाहून नेण्याची क्षमता सरकारमध्ये असेल तर त्यांनी तसे करावे. शिवाय आम्ही जे मैदानावर पाणी टाकतो ते जमिनीतच झिरपते आहे, अशा मल्लीनथीला काय म्हणावे हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर अशा मैदानावार वापरण्यात येणार्‌या पाण्याचा स्रोत शोधण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. लोकांचे खेळातून आम्ही मनोरंजन करतो हे सांगणारे आयपीएलचे व्यवस्थापन जेव्हा चइर गर्ल्स नाचवते तेव्हा पाण्यासाठी रक्त आटवणार्‍या आणि सांडणार्‍या महाराष्ट्राचे कोणते मनोरंजन होते याचा उलगडा झाला असता तर तो पाहिजे होता. कॉंग्रेस  सरकारच्या काळात दोन वेळा संपुर्ण क्रिकेट स्पर्धाच दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत केल्याचा इतिहास ताजा आहे. त्याहीपुर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताची फलंदाजी चालू होती. संदिप पाटील या आपल्या फलंदाजाने बातमी समजताच फलंदाजी बंद करुन तो सामनाच र केला होता. तिथे व्यापारी आयपीएल केवळ महाराष्ट्रा बाहेर नेण्याची मागणी होती. पाण्यासाठी जीव जात आहे तरीही पाणी पाणी करणार्‍या महाराष्ट्राच्या मढ्यावर आयपीएलचा नंगा नाच होऊ घातलाय. यापेक्षा निर्दयी दुर्देव काय असू शकते? पाण्याचं दुर्भिक्ष्य, दुष्काळाच्या झळ्या अशी पार्श्वभूमी असली तरी पानगळ झालेल्या कृष फांद्यावर उगवणारी चैत्राची पालवी भारतवासीयांच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या आयुष्यात सुख-समाधान-शांती घेऊनच येवो ही LSSNEWS24 या वृत्तसेवेतर्फे मी सॉलोमन गायकवाड आपणांस मनापासून या मराठी वर्षाच्या शुभारंभी शुभेच्छा देतो.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: महाराष्ट्राच्या मढ्यावर आयपीलएचा नंगानाच
महाराष्ट्राच्या मढ्यावर आयपीलएचा नंगानाच
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhol3OO2jbj6KsOAV5gzliDM_9zknKwMDaJc8DUd1TWYqn7d-XaxnA4BQlYFGfCLY4LpXu6DJVeepY9tttTK2cRdZM5lkXH5_ZP704FW6F5Nqh6vHCNGzhvtuFXjrIVKmnXtnHxnvIWN5a4/s320/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhol3OO2jbj6KsOAV5gzliDM_9zknKwMDaJc8DUd1TWYqn7d-XaxnA4BQlYFGfCLY4LpXu6DJVeepY9tttTK2cRdZM5lkXH5_ZP704FW6F5Nqh6vHCNGzhvtuFXjrIVKmnXtnHxnvIWN5a4/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_281.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_281.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago