नगर- कर्जत तालुयातील राशीनचे माजी सरपंच प्रविण मधुकर बोधे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 38 वर्षाचे होते. त्यांच्यावर राशीन ...
नगर- कर्जत तालुयातील राशीनचे माजी सरपंच प्रविण मधुकर बोधे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 38 वर्षाचे होते. त्यांच्यावर राशीन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.बोधे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. नगर (शिंदे मळा, सावेडी) येथील नामदेव शिंपी समाजाचे विश्वस्त दिलीप काकडे यांचे ते मेव्हुणे होते. त्याच्या निधनाने राशीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










