नगर - नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील जिल्हा परिषद शाळेने आयएसओ मानांकन मिळविले आहे. जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिक...
नगर - नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील जिल्हा परिषद शाळेने आयएसओ मानांकन मिळविले आहे. जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलायला हवा. वडगाव गुप्ता येथील शाळेकडे मात्र पालक आशेने पाहतात. येथे मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व मुलांना समजेल असे शिक्षण देऊन गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या व शाळेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी उर्त्स्फूतपणे सहभागी होऊन यश संपादन करीत आहे. गावातील नागरिकांनी लोकसहभाग देत शाळेच्या विकासाच्या दृष्टीने व प्रश्न मार्गी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.
वडगाव गुप्ता (ता. नगर) जिल्हा परिषद शाळेला आता आयएसओ मानांकन मिळविले असून, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा उद्योजक विजय शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्याम पिंपळे, अशोक गुडगळ, लक्ष्मण गव्हाणे, नारायण शिंदे, नवनाथ शिंदे, बाबासाहेब गव्हाणे, हुसेन सय्यद, बाळू कळमकर, रंगनाथ डोंगरे, भानुदास काळे, मुख्या. वसुंधरा ठुबे, उलका साठे, रामदास दरंदले, रंजना चेमटे, सरोजिनी बाबर, कल्पना देशमुख, सुधीर रणदिवे, संतोष कोरडे, सविता वेताळ, मनीषा क्षेत्रे, स्वाती कदम आदी उपस्थित होते.
विजय शेवाळे म्हणाले की, शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण होत असताना येथील जि. प. शाळेत मात्र वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. येथील मुले खासगी शाळांत नाही तर जि. प. शाळांत शिक्षण घेण्याला प्राधान्य देत आहेत. शाळेने आयएसओ मानांकनासाठीचे सर्व निकष पूर्ण करीत मानांकन मिळविले, याचा आम्हाला अभिमान आहे. जि. प. शाळांत सर्वसामान्य मुलांना चांगल्या दर्जाचे व अत्यंत र्मोंक दरात शिक्षण मिळते, असे ते म्हणाले.
मुख्या. वसुंधरा ठुबे म्हणाल्या की, वडगाव गुप्ता (ता. नगर) जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन मिळण्यासाठी शाळेतील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचेही योगदान मोठे आहे, तसेच ग्रामस्थांनी मदत केल्यामुळेच शाळेला हा पुरस्कार मिळू शकला. मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करून जि. प. शाळेकडे मुले आकर्षित व्हावीत, यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.










