जयंतीनिमित्त मिरवणूक व व्याख्यानाचे आयोजन सकल जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर व तालुक्यातील जैन बांधवांची लक्षणीय उपस्थिती महाव...
जयंतीनिमित्त मिरवणूक व व्याख्यानाचे आयोजन सकल जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर व तालुक्यातील जैन बांधवांची लक्षणीय उपस्थिती महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्व जैन बांधवांनी जैन स्थानकात एकत्रीत येऊन महावीरांच्या प्रतीमेचे पूजन करुन दर्शन घेतले व महावीरांनी दिेलेल्या सत्य अहिंसेच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला. जयंती निमित्त स्थानकामध्ये प्रा.सुषमा करंदकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा.करंदीकर यांनी आपल्या व्याख्यान्यात स्वस्थ कुटुंब कसे असावे त्यासाठी नात्यात गोडवा कसा निर्माण करता येईल. कमी करुन या क्षणभंगुर जीवनाचा आनंद वाढवून आय़ुष्यातील जीवनाचे प्रथ्येक क्षणाच्या आनंदाचा उपभोग कसा घेता येईल हे आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून व मार्गदर्शनाद्वारे करुन दिले. करंदीकरांनी कुटुंब, परिवार व त्यातील सदस्य कुटुंब स्वस्थ राहण्यासाठीच्या दृष्टीने आवश्यक असलेले एक दुसऱ्या प्रती प्रेम, आदर व स्वतः मोठ्या त्याग व मनाचा मोठेपणा दाखवून कामामध्ये हातभार लावून आपापसातील स्नेह वाढवता येईल व कोणीही कोणाला कमी न लेखता घर दोघांचे अशा समजून वागल्यास घर निश्चित स्वर्ग वाटेल. सासु-सुनेने देखील एकमेकांचे स्वभाव, आवडी-निवडी अपेक्षा ओळखून कोणाचेही मन न
दुखावता वागण्याचा प्रयत्न केला तसेच महिलांनीही करीअर करण्याकडे जास्त लक्ष न देता घरकामाला प्राधान्य देऊन बरोबरीने राहिले तर सुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना पेक्षाही मेरा घर है स्वर्ग से सुंदर असं म्हणावेसे वाटेल. हे सांगतानाच महिलांनाही सर्वांसमक्ष तरीही खाजगीत काही टिप्स देवून आपलं घर सुरक्षीत ठेवता येईल याबाबत सल्ला दिला.
यावेळी प्रकाश पटवा, सचिन गांधी, दिलीप मेहता, डॉ.ज्ञानदेव म्हस्के, सतिष पोखर्णा, सुरेश बोरा, चंद्रकांत कटारिया, सतिष बोरा, सुरेश भंडारी, भरतकुमार नहाटा, अतुल मेथा, अनिल गांधी, राहुल कोठारी, भुषण गांधी, आशिष भंडारी, संदीप गुगळे, लौकीक मेहता, आनंद कटारिया, निलेश मेहेर, महावीर पटवा, रमेश बोरा, राहुल बलदोटा, सुनिल मुनोत, सुरेंद्र गांधी, दिपक भंडारी, गौरव पोखर्णा आदिंसह जैन बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या. सायंकाळी 6 वाजता काळकाई चौक येषून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची ढोल-लेझीम व इतर वाद्यांसह सर्व जैन बांधव, महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काळकाई चौक, शिवाजी चौक, रविवार पेठ, शनिमारुती चौक, रोहिदास चौक मार्गे मिरवणुकीची स्थानकामध्ये सांगता करण्यात आली.
एकसारख्या वेषभुषा व डोक्यावर फेटे बांधून सकल जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त तसेच शहर तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांनी दर्शन व एकी दाखवून आनंदमय वातावरणात महावीरांची जयंती साजरी केली. आनंदमय वातावरणात माहवीरांची जयंती साजरी केली. मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष शकीलभाई शेख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, घनशाम शेलार आदींनी जैन बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.










