नगर- अहमदनगर शहर सलून असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.11 एप्रिल 2016 रोजी श्री.संतसेना महाराज मंदीर, पानसरे गल्ली येथे, म...
नगर- अहमदनगर शहर सलून असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.11 एप्रिल 2016 रोजी श्री.संतसेना महाराज मंदीर, पानसरे गल्ली येथे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
अहमदनगर शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते श्री.जीवन शांतीलाल सोन्नीस यांची नुतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष यांनी संघटनेची पढील दिशा या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्ष संजय मदने व बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधरण सभा खेळी-मेळभच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी शिवाजी दळवी, दिपक बिडवे, शहाजी कदम, मधुकर भुजबळ, राजेंद्र भुजबळ, शरद दळवी, बबनराव मदने, विशाल सैंदाणे, जनार्दन वाघ, अदिनाथ रावताळे, मनोज नन्नवरे, ज्ञानेश्वर निकम, आबा सैंदाणे, बापु क्षिरसागर, अनिल कदम, शेख शेरअली, शेख अब्दुल, शकल शेख, हैदर शेख, मुराद शेख, दिलीप शिंदे, विशाल मदने, सागर साळुंके, संतोष जाधव, माऊली गायकवाड, आशिष ताकपिरे, आबा हिरे, वैभव सैंदाणे, संतोष भालेराव कृष्णा हिरे आदिंसह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.









