Archive Pages Design$type=blogging

पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांचा दणदणीत विजय

  नगर - प्रभाग 3 चे नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी प्रतिभा भांगरे...

 


नगर - प्रभाग 3 चे नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी प्रतिभा भांगरे यांना विजय मिळवून दिला. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का दिला. 

प्रभाग 3 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा गायकवाड यांचा दणदणीत पराभव केला. नुकत्याच झालेल्या प्रभाग ११ मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला होता. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक युती-आघाडीसाठी महत्त्वाची होती. त्यात सेनेने बाजी मारली. 

रविवारी झालेल्या या निवडणुकीत अवघे ४६ टक्के मतदान झाले. सेनेच्या भांगरे यांना हजार ६०१, राष्ट्रवादीचे गायकवाड यांना हजार २५३, तर अपक्ष उमेदवार अनिता दळवी यांना अवघे ३५ मते मिळाली. विशेष म्हणजे ७३ मतदारांनी "नोटा'चा वापर केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग मध्ये सेनेचे दोन्ही नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी विजय भांगरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. विजय भांगरे यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय ठोंबरे यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला होता. प्रभाग ११ मधील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने सेनेच्या प्रतिभा भांगरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्त्यांनी मात्र भांगरे यांना निवडून आणण्याचा विडा उचलला होता. सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड यांच्यासह सर्व ज्येष्ठ नगरसेवक कार्यकर्त्यांनी प्रभागात तळ ठोकला होता. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांनीदेखील गायकवाड यांच्या प्रचारासाठी प्रभाग पिंजून काढला. १० हजार ७२६ नागरिकांना मतदाराचा अधिकार होता. प्रत्यक्षात मात्र निम्म्यापेक्षा कमी नागरिकांनीच मतदानाचा अधिकार बजावला.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांचा दणदणीत विजय
पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांचा दणदणीत विजय
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvCjLxqjWktk228_vWo_d0hSNsujPJhyphenhyphenh4LiHzTgDKFcdL9vnqp7mt1V_THAN36bWPaWy3XhFJVnoP678xpKH5Wqe0TBG82Gb0hCr4VFRWszkcwrYpf1huJDNlSHt0sqxzr8eKMhcR45rZ/s1600/pratibbha+bhangre.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvCjLxqjWktk228_vWo_d0hSNsujPJhyphenhyphenh4LiHzTgDKFcdL9vnqp7mt1V_THAN36bWPaWy3XhFJVnoP678xpKH5Wqe0TBG82Gb0hCr4VFRWszkcwrYpf1huJDNlSHt0sqxzr8eKMhcR45rZ/s72-c/pratibbha+bhangre.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_322.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_322.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago