नगर- जीवनात एखादे लक्ष ठेवून जिद्द, मेहनत व चिकाटीने ते साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळते. त्यासाठी प्रत्येकाने...
नगर- जीवनात एखादे लक्ष ठेवून जिद्द, मेहनत व चिकाटीने ते साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळते. त्यासाठी प्रत्येकाने आपणास काय करायचे आहे हे निश्चित केले पाहिजे. त्यासाठी अपार कष्ट केले पाहिजे. ध्येय निश्चित असल्यास त्यात येणार्या अडचणींवर मात करण्याची शक्ती आपल्या आतूनच मिळत असते. आणि या शक्तीच्या जोरावर आपणास यश मिळते, असे प्रतिपादन एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अतुल कानडे यांनी केले.
एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अतुल कानडे यांचा नगर येथे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सचिव अशोक कानडे व विश्वस्त विजय कोथिंबीरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, गजानन ससाणे, दत्ता जाधव, कैलास खरपुडे, अनिल ससाणे, मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र ससाणे, कुणाल ससाणे, रतन कानडे, अजय सुपेकर, राऊत आदि उपस्थित होते.









