नगर - बसस्थानकात नेहमीच बाहेरगावाहून येणार्या व जाणार्यांची मोठी गर्दी असते. त्यांना बसस्थानकात थंड पाणी मिळावे, यासाठी तारकपूर बसस्था...
नगर - बसस्थानकात नेहमीच बाहेरगावाहून येणार्या व जाणार्यांची मोठी गर्दी असते. त्यांना बसस्थानकात थंड पाणी मिळावे, यासाठी तारकपूर बसस्थानकात पूज्य सद्गुरू स्वामी टेऊंरामजीमहाराज जलसेवा (पाणपोई) सुरू करण्यात आली.या पाणपोईचे उद्घाटन एसटीचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक अधीक्षक जालिंदर शिरसाठ, मनसे एसटीचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, डेपो मॅनेजर नेहूल, बल्लू सचदेव, संजय आहुजा, विकी कुकरेजा, जीवन हिरानंदानी, रमेश कुकरेजा, मुकेश जाधवानी, सुनील बजाज, रूपचंद तलरेजा, श्याम जाधव, नंदलाल बजाज, विनायक वाघ, कांता बजाज, वर्षा हिरानंदानी आदी उपस्थित होते.










