नगर - सुवालाल गुंदेचा यांच्या बहुमोल योगदानाने गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात अर्बन बँक प्रगतीच्या मार्गावर आहे. सहकार क्षे...
नगर - सुवालाल गुंदेचा यांच्या बहुमोल योगदानाने गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात अर्बन बँक प्रगतीच्या मार्गावर आहे. सहकार क्षेत्रात आजपर्यंत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार खा.दिलीप गांधी यांनी काढले.
अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन सुवालाल गुंदेचा यांच्या वाढदिवसानिमित्त अर्बन बँकेच्यावतीने सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले. बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी, व्हा.चेअरमन शैलेश मुनोत, संचालक दिपक गांधी, अशोक कटारिया, साधना भंडारी, अनिल कोठारी, अजय बोरा, मनेष साठे, माजी संचालक आर.एस.बोरा, प्रशासकीय अधिकारी विलास बडवे, पवन गांधी आदिंनी सुवालाल गुंदेचा यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी सुवालाल गुंदेचा यांनी सर्वांचे आभार मानून सर्व संचालक मंडळाच्या व चेअरमन खा.दिलीप गांधी यांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करता येत असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या.









