राहुरी तालुक्याची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा नदीच्या पात्रातून लिलाव पद्धतीने तसेच अनाधिकृत पद्धतीने फोक्ल्यांड, जे...
राहुरी तालुक्याची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा नदीच्या पात्रातून लिलाव पद्धतीने तसेच अनाधिकृत पद्धतीने फोक्ल्यांड, जेसीबी व ट्रॅक्टर यांचा वापर करून वाळू उपसा केला जात आहे त्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे यातून नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील दुष्काळाचा सामना करावा लागत आहे शेतकरीवर्गानी या व्यथा क्रांतीसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यासमोर मांडल्या आहेत
संपूर्ण मुळा नदी पत्रातील वाळू उपसा बंद करावा या मागणीचे निवेदन क्रांतीसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुरी तहसीलचे नायब तहसीलदार तेलोरे व पोलिस उपनिरीक्षक महावीर निवेदन देण्यात आले राहुरी खुर्द येथील नगर मनमाड लगतच्या नदी पात्रावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणावर मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा झाल्यामुळे पुलाची मजबुती धोक्यात आली आहे सदर दोन्ही पुलाची पाहणी करून वाळू उपसा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे लिलाव घेणाऱ्या कंत्राटदारावर आणि सदर मालमत्तेची जबाबदारी असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून भरपाई करून घेण्यात यावी. या मागण्या पूर्ण न झाल्यास क्रांतीसेना पक्ष, शेतकरी व विविध सेवा संघटनांच्या वतीने दि १०/ ५ /२०१६ रोजी राहुरी बस स्थानका समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश येवले यांनी सांगितले
यावेळी जिल्हा संघटक नामदेव पवार, तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, ता उपाध्यक्ष जालिंदर शेडगे, राहुल घोरपडे योगेश सजगुरे नवनाथ लोंढे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .










