नगर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यामातून व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, मतदान स्वातंत्र्य आदी मुलभुत हक ...
नगर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यामातून व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, मतदान स्वातंत्र्य आदी मुलभुत हक मानवाला मिळवुन दिले. समता, बंधुत्व, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक, सामाजिक न्याय, एकात्मता, सांप्रदायिक सद्भावना व सहिष्णूता, आंधश्रद्धा निर्मुलन यासाठी संघर्ष व त्याग करुन आदर्श तत्वज्ञानामुळे संपुर्ण मानव समाज उपकृत केला. तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेवुन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवावा असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
भुतकरवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर अभिषेक कळमकर बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक दगडूमामा पवार, हनुमंत भुतकर, संजय सत्रे, आबासाहेब वाघमारे, विजय जगताप, सचिन भिंगारदिवे, अमोल भिंगारदिेवे, संदिप जरे, किरण भिंगारदिवे, उमेश भांबरकर, दिलीप भिंगारदिवे, नितीन भिंगारदिवे, दत्तात्रय भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, संतोष भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, राजन कांबळे, संजय कांबळे, अनिल भिंगारदिवे, धनंजय भिंगारदिवे, विठ्ठल वाघमारे, भैय्या कोरेकर, क्षितीज कांबळे, लाला जगताप, चैतन्य ससे, अक्षय भगत, अमोल भगत, नितीन गवळी, दुर्गेस कुंठे, भैय्या पवार, सुधीर कोरेकर, सागर दळवी, उद्देश जगताप, ऋषीकेश गायकवाड, राहुल उमाप, सोनु दळवी, ऋषिकेश चांदगुडे, आकाश भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, सुशांत भिंगारदिवे, ऋषिकेश भिंगारदिवे, पप्पू भिंगारदिवे, जगताप, कुमार गायकवाड, सागर खराडे, विक्रम पवार, राजु जरे, राजहंस कोरेकर, योगेश कोरेकर, नंदु गिखल, दिपक खेडकर, अक्षय दुधाळ, अक्षय जाधव आदि उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन भिंगारदिवे यांनी केले. तर आभार दिपक भिंगारदिवे यांनी मानले.










