नगर- अराध्य युवा प्रतिष्ठान हे नेहमी वर्षभर सामाजिक कार्य करणारे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान, नेत्रतपासणी शिबी...
नगर- अराध्य युवा प्रतिष्ठान हे नेहमी वर्षभर सामाजिक कार्य करणारे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान, नेत्रतपासणी शिबीर, वृक्षारोपण, रीब अनाथांना मदत, महाप्रसाद वाटप आदिंच्या माध्यमातून जनसामान्यांत आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांनी विविध स्पर्धा घेऊन मुलांच्या कला-गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.कायनेटिक चौक आराध्य प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य सजावट करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या पुतळ्यास आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निलेश बांगरे, राज्य अध्यक्ष संदेश इंगळे, उपाध्यक्ष दादा पटारे, सुरेश बनसोडे, विजय गव्हाळे, संभाजी पवार, दिलीप पवार, संजय कांबळे, दिपक लोंढे, ज्ञानेश्वर कवडे, विजय घासे, अजय शिंदे, बाळासाहेब भागानगरे, संतोष नन्नवरे, वसंत पेटारे, प्रभाकर इंगळे, मयुर बांगरे, वैभव जाधव, दिपक मराठे, महेश आठवले, नितीन मेहेत्रे, भिकू लसगरे, रोहिदास छरे, चंदन खंडागळे, विशाल बळीद, दत्ता कचरे आदि उपस्थित होते.









