नगर - कोणतीही आर्थिक संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या संचालकांबरोबरच कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते. संचालक हे संस्थेच...
नगर - कोणतीही आर्थिक संस्थेची प्रगती ही त्या संस्थेच्या संचालकांबरोबरच कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते. संचालक हे संस्थेच्या प्रगतीसाठी ढोबळमनाने प्रयत्न करत असतात; परंतु अधिकारी व कर्मचारी हे प्रत्येक पै ना पै चा हिशोब ठेवून संस्थेच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावत असतात. कर्मचार्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवरच आज अनेक मोठमोठ्या संस्था, बँका, पतसंस्था चांगल्या स्थितीत उभ्या आहे. संचालकांनीही अधिकारी व कर्मचार्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक केल्यास त्यांच्यात संस्थेविषयी आस्थानिर्माण होऊन संस्थेच्या उन्नत्तीस मोठा हातभार लागू शकतो. भिंगार बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणून गेल्या 100 वर्षांपासून काम करत आहेत. त्यातील कर्मचार्यांच्या कामाचे कौतुक होणे ही आनंददायी बाब असल्याचे प्रतिपादन भिंगार बँकेचे संचालक व सद्गुरु गेंडानाथ महाराज उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलास खरपुडे यांनी केले.
भिंगार अर्बन बँकेने मोठ्या प्रमाणात नफा मिळवून कर्ज वसुली केली; त्याबद्दल बँकेचे जन.मॅनेजर पांडूरंग हजारे व नगर जिल्ह्यातील शाखाधिकार्यांचा गेंडानाथ महाराज उत्सव समितीच्यावतीने विशाल गणेश मंदिर येथे संगमनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कैलास खरपुडे, उपाध्यक्ष अशोक कापरे, सचिव अजय नरवडे, सहसचिव अशोक टिळेकर, कोषाध्यक्ष अर्जुनराव गोंधळे, गोरख कांबळे, राहुल गायकवाड, बापूसाहेब शिंदे, विलास रासकर, प्रकाश शिंदे, चंद्रकांत ताठे, अनिता खरपुडे, मनिषा मोकाटे आदि उपस्थित होते.









