नगर - नगरशहराजवळील नागापूर एमआयडीसीमधील लघुउद्योजकांना छोटे प्लॉट उपलब्ध होण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट...
नगर - नगरशहराजवळील नागापूर एमआयडीसीमधील लघुउद्योजकांना छोटे प्लॉट उपलब्ध होण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या अध्यक्ष तथा उद्योजक प्रविणा घैसास यांना नुकतेच देण्यात आले.एमआयडीसीमध्ये २०० ते २५० लघुउद्योजक मागील दहा-पंधरा वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. या उद्योजकांकडे स्वत:चा औद्योगिक प्लॉट नसल्याने भांडवल उभारणीपासून काम मिळवण्यापर्यंत, तसेच मिळालेल्या कामाचे पैसे वसूल करण्यापर्यंत अनेक प्रश्नांना तोंड
द्यावे लागत आहे, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रत्येकी लघुउद्योजक हजार, बाराशे कामगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. स्वत:चे प्लॉट नसल्याने संधी काम करण्याची तयारी असून मोठे काम मिळत नाही. काम मिळाले तर बँका आर्थिक साहाय्य कर्ज उपलब्ध करत नसल्याने, इतर ठिकाणी व्यवसाय थाटला, तर वीज, पाणी रस्त्यांचे प्रश्न असल्याचे निवेदनात नमूद करून त्वरित लघुउद्योजकांना प्लॉट मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी (नाशिक), लघुउद्योग विकासमंत्री, मुख्यमंत्री यांना या प्रश्नांसंदर्भात निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे. मात्र, लघुउद्योजकांकडे शासन लक्ष देत नसल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी संघटनेच्या वतीने घैसास यांना निवेदन देण्यात आले.









