नगर - : मुस्लिम समाजाची परिक्षेबद्दलचे अज्ञान दूर करुन त्यांना मार्गदर्शन करुन त्यांची शैक्षणिक आधोगती व त्याला कारणीभूत असणारी मुस...
नगर - : मुस्लिम समाजाची परिक्षेबद्दलचे अज्ञान दूर करुन त्यांना मार्गदर्शन करुन त्यांची शैक्षणिक आधोगती व त्याला कारणीभूत असणारी मुस्लिम समाजाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई येथील अंजुमने इस्लाम व रहेमानी-30 या संस्थेच्यावतीने मुस्लिम समाजासाठी आयआयटी व जेईई व मेडिकलची एआयपीएमटी परिक्षेसाठी 10 वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परिक्षा संपन्न झाली. संपूर्ण राज्यातून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. या परिक्षेतून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना रहेमानी - 30 संस्थेतर्फे 11 वी व 12 वी चे शिक्षण, राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत व जेईई व एआयपीएमटीची तयारी करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजाचा आयआयटी व मेडिकलमधील टक्का वाढवा, विद्यार्थ्यांमध्ये या परिक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अंजुमने इस्लाम व रहेमानी-30 यांनी केले होते. ही परिक्षा आज अलहिलाल अल्पसंख्यांक एज्युकेशन ऍण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने व चॉंद सुलताना हामस्कूलच्या सहकार्याने संपन्न झाली. यामध्ये जिल्ह्यातून 58 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही परिक्षा चॉंद सुलताना हायस्कूल येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन, नगरसेवक हाजी नजीर अहेमद (नज्जू पहेलवान), सेक्रेटरी हाजी शौकतभाई तांबोळी यांनी परिक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. परिक्षेसाठी केंद्रप्रमुख मो.युसूफ तांबोळी, शेख अकिल अहमद व शफी खुदाबक्ष यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.









